नवी दिल्ली, दि. 31 - कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. भारतातील 16 वर्षाच्या एका विद्यार्थानं वर्षाला एक कोटी 44 लाख रुपयांचा पगार घेत नवा इतिहास रचला आहे. हर्षित शर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. चंदीगड येथे राहणाऱ्या हर्षितने सरकारी मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमधून यावर्षी बारावीची परीक्षा दिली आहे. ऑगस्टमध्ये तो ट्रेनिंगसाठी अमेरिकेला जाणार आहे. इंटरनेट जायंट गूगलने हर्षित शर्मा आयकॉन डिजाइनिंगसाठी सिलेक्ट केलं आहे. गूगलच्या या स्पेशल प्रोग्रामसाठी हर्षित एक वर्षाची ट्रेनिंग दिली जाणार आहे. ट्रेनिंग दरम्यान त्याला प्रत्येक महिन्याला चार लाख रुपये पगार दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होताच हर्षितचा पगार 12 लाख रुपये प्रति महिना होणार आहे.इंटरनेट जायंट गूगलने हर्षितची निवड केल्यानंतर त्याच्या कुटुंबियामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी माध्यामांशी बोलताना हर्षित म्हणाला, गुगलने जॉबची ऑफर दिल्यानंतर मला पहिल्यांदा विश्वास बसला नाही. माझी 12 वी ची परिक्षा झाल्यानंतर मी ऑनलाइन जॉब सर्च करत होतो. मे मध्ये मी गुगलच्या पदासाठी अप्लाय केलं होतं. त्याचवेळी मी ऑनलाइन मुलाखतही दिली होती. गेल्या दहा वर्षापासून मला ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये आवड होती. मुलाखतीनंतर ज्यावेळी त्यांनी माझ्या कामाबातचा डाटा मागवला त्यावेळी मी जे पोस्टर डिझाईन केलं ते त्यांना पाठवलं होतं. त्यावरच मला ही संधी मिळाली आहे. गूगलने ऑगस्टमध्ये ज्वॉइन करण्यास सांगितलं आहे.हर्षितचे आई आणि वडिल हे शिक्षक आहेत. तर लहान भाऊ 10 वी मध्ये शिकत आहे. हर्षितने आपलं शिक्षण काकांकडे राहून पुर्ण केलं आहे. गेल्या वर्षी हर्षितला प्रधानमंत्री डिजिटल इंडिया स्कीमच्या अंतर्गत सात हजार रुपयांचं बक्षिस मिळालं आहे.
वर्षाला एक कोटी 44 लाख रुपये पगार घेत 16 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याने रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 9:48 PM
कदाचीत तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. भारतातील 16 वर्षाच्या एका विद्यार्थानं वर्षाला एक कोटी 44 लाख रुपयांचा पगार घेत नवा इतिहास रचला आहे.
ठळक मुद्देगेल्या दहा वर्षापासून करत होता ग्राफिक्स डिजाइनिंगमध्ये कामया वर्षी दिली आहे बारावीची परीक्षाट्रेनिंगसाठी ऑगस्टमध्ये जाणार अमेरिकेला