शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आंध्र प्रदेश व ओडिशात पुन्हा येणार चंद्राबाबू आणि नवीनबाबूंचे सरकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 5:11 AM

राज्यात सत्ता मिळणार; पण लोकसभेत मात्र फटका

अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत विजय मिळवून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कदाचित पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील. मात्र, केंद्र सरकारच्या स्थापनेत किंगमेकर बनण्याचे त्यांचे स्वप्न कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांच्यामुळे भंग पावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यामध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाला तेलुगू देसम पक्षापेक्षा (टीडीपी) जास्त जागा मिळतील, असा निष्कर्ष एक्झिट पोलनी व्यक्त केला आहे.

लगडपती राजा गोपाल सर्वेक्षणातून असा निष्कर्ष आला की, आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत टीडीपीला ९० ते ११० जागा मिळतील. वायएसआर काँग्रेसला ६५ ते ७९ व अन्य पक्षांना १ ते ५ जागा मिळतील. आरजी फ्लॅश पोलमध्येही टीडीपीचेच सरकार पुन्हा राज्यात सत्तेवर येणार असे म्हटलेआहे.

न्यूज १८-आयपीएसओएसच्या पोलने म्हटले आहे की, वायएसआर काँग्रेसला १३ तर टीडीपीला ११ लोकसभेच्या जागा मिळतील. रिपब्लिक-सी व्होटरच्या पोलचा निष्कर्ष आहे की, टीडीपीला १४ तर वायएसआर काँग्रेसला ११ लोकसभेच्या जागा मिळतील. एनडीए, यूपीएला आंध्र प्रदेशमध्ये एकही जागा जिंकता येणार नाही. चाणक्य-न्यूज२४ ने टीडीपीला १७ तर वायएसआर काँग्रेसला ८ लोकसभेच्या जागा मिळतील, असे भाकीत केलेआहे. (वृत्तसंस्था)स्पष्ट बहुमताचा अंदाजभुवनेश्वर : ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल. मात्र, राज्यात भाजप बिजदपेक्षा लोकसभेच्या अधिक जागा जिंकेल, असा एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा असून, त्यापैकी भाजपला ६ ते १९ व बिजदला २ ते १५ जागांवर विजय मिळेल, असे या निष्कर्षांत म्हटले आहे.काँग्रेसला कदाचित एखादी जागा जिंकता येईल किंवा त्या पक्षाच्या हाती शून्य उरेल. संवाद-कनक पोलमध्ये राज्यात भाजपला लोकसभेच्या १२ जागा, बिजदला ६ जागा मिळतील, असे म्हटले आहे. टाइम्स नाऊच्या पोलमध्ये बिजदला ८, भाजपला १२, काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.147सदस्यांच्या ओडिशा विधानसभा निवडणुकांत संवाद-कनक न्यूज पोलच्या निष्कर्षानुसार बिजद ८५ ते ९५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवेल. भाजपला २१ ते ३४, काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत बिजदने ११७, काँग्रेसने १६ व भाजपने १० जागा जिंकल्या होत्या.