शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

चंद्राबाबू नायडूंना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे - जगनमोहन रेड्डी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 10:17 PM

आंध्रप्रदेशातील नंद्यालमध्ये होणा-या पोटनिवडणुकीच्या पहिल्याच दिवशी वायएसआर कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर ह्ल्लाबोल केला.

ठळक मुद्देचंद्राबाबू नायडू यांच्यावर ह्ल्लाबोल.भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे.लोकांना खोटी आश्वासने दिली.

नवी दिल्ली, दि. 4 - आंध्रप्रदेशातील नंद्यालमध्ये होणा-या पोटनिवडणुकीच्या पहिल्याच दिवशी वायएसआर कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर ह्ल्लाबोल केला. यावेळी जगनमोहन रेड्डी म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांसारख्या लोकांना भरचौकात गोळ्या घातल्या, तर काही चुकीचे होणार नाही.  आंध्रप्रदेशातील नंद्याल  मतदार संघासाठी पोटनिवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान, वायएसआर कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलावर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. नंद्यालमध्ये वायएसआर कॉंग्रेस पार्टीला मिळणा-या पाठिंब्यामुळे चंद्राबाबू नायडू यांना भीती वाटू लागली आहे. या भीतीमुळेच त्यांनी येथील विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अन्यथा एक रुपया सुद्धा त्यांनी दिला नसता, असे जगनमोहन रेड्डी म्हणाले. ही फक्त पोटनिवडणूक नाही, तर न्याय आणि अन्याय यांच्यातील लढाई आहे. या पोटनिवडणुकीत जनता चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांसारख्या भ्रष्टाचार करणा-या लोकांना जर भरचौकात गोळ्या घातल्या, तर काही चुकीचे होणार नाही. त्यांच्या हातात सत्ता असून त्यांनी येथील शेतकरी, महिला आणि बेरोजगारांना काही दिले नाही. फक्त निवडणुकीच्या काळात अशा लोकांना खोटी आश्वासने दिले, असेही यावेळी जगनमोहन रेड्डी म्हणाले. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तेलगू देशम पार्टीच्या एका स्थानिक नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.