शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 9:17 AM

Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील.

विजयवाडा : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज (दि.१२) चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंडी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमित शाह आणि जेपी नड्डा या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळीच हैदराबादला पोहोचले आहेत.

मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील ए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये टीडीपीसह एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत टीडीपी आणि एनडीएच्या आमदारांनी चंद्राबाबू नायडू यांची नेता म्हणून निवड केली. यानंतर एनडीए नेत्यांच्या विनंतीनंतर राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी राजभवनात राज्यपालांची यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.

दरम्यान, आज चंद्राबाबू नायडू विजयवाडाच्या बाहेरील परिसर केसरपल्ली येथील गन्नावरम विमानतळासमोरील मेधा आयटी पार्कजवळ ११.२७ वाजता शपथ घेतील. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत इतर नेतेही शपथ घेण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये जनसेना प्रमुख पवन कल्याण आणि ज्येष्ठ नेते एन. मनोहर, नायडू यांचे पुत्र नारा लोकेश आणि टीडीपी आंध्र प्रदेशचे नेते अचेन नायडू यांचा समावेश आहे. पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील. यामध्ये टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ आणि भाजपचे २ मंत्री असणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता. आंध्र प्रदेश विधानसभेत १७५ जागा आहेत. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार आणि भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत. संभाव्य मंत्र्यांची यादी...चंद्राबाबू नायडूपवन कल्याण (JSP)किंजरापु अचेन्नायडूकोल्लू रवींद्रनादेंदला मनोहर (JSP)पी नारायणवंगालपुडी अनितासत्यकुमार यादव (भाजप)निम्माला रामनायडूएनएमडी फारुकअनम रामनारायण रेड्डीपय्यावुला केशवअग्नी सत्यप्रसादकोळसू पार्थसाराधीडोला बलवीरंजनेयस्वामीगोटीपती रवीकंदुला दुर्गेश (JSP)गुम्मदी संध्याराणीबीसी जनार्थन रेड्डीटीजी भरतएस सवितावासमशेट्टी सुभाषकोंडापल्ली श्रीनिवासराम प्रसाद रेड्डीनारा लोकेश

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश