शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

जगनमोहनच्या ‘वादळात’ चंद्राबाबूंची नौका बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:59 AM

आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले.

- समीर इनामदार अमरावती : आंध्रप्रदेशातील १३ जिल्ह्यात हजारो किलोमीटर पदयात्रा करीत लोकांमध्ये स्थान निर्माण केलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेत आपले वर्चस्व निर्माण केले. वडील आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्यानंतर मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. वायएसआर काँग्रेसने निर्माण केलेल्या वादळात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची नौका बुडाली.युवाजन श्रमिक रयतू काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २३ जागांवर विजय मिळविला तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागा जिंकल्या. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला २३ तर जनसेना पक्षाला केवळ एक जागा मिळू शकली. लोकसभेच्या २५ जागांपैकी तेलुगू देसम पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या.२०१३ ते २०१७ पर्यंत तेलुगू देसम पक्ष आणि एनडीए यांची युती होती. चंद्राबाबू नायडू गेल्या अनेक वर्षांपासून आंध्रसाठी विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी करीत होते. केंद्राने ही मागणी फेटाळल्यानंतर नायडू यांनी एनडीएपासून फारकत घेतली. केंद्रातील मंत्र्यांनी राजीनामे दिले; मात्र निवडणुकीत याचा तेलुगू देसमला फटका बसला.जगनमोहन यांच्या प्रचारात प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका होती. त्याशिवाय अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षामुळे तेलुगू देसम पक्षाला नुकसान सहन करावे लागले. वायएसआर काँग्रेसने आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लीम यांची मोट बांधली. त्याचा फायदा जगनमोहन यांना मिळाला. कापू समाज जगनमोहन यांच्यासमवेत राहिला. रायलसीमाच्या ५२ पैकी ५० जागांवर तेलुगू देसमला पराभव पत्करावा लागला. वायएसआर काँग्रेसने ४९.९ टक्के मते मिळविली. तेलुगू देसम पक्षाला ३९.२ टक्के मते मिळाली.या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला खातेही उघडता आले नाही. मुख्य लढाई तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातच झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपला नोटापेक्षाही कमी मते मिळाली.जगनमोहन यांच्यासमोर आता नव्याने स्थापन झालेल्या आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीचे मोठे आव्हान समोर आहे. सध्या आंध्रप्रदेशसमोर २.५८ लाख कोटींचे कर्ज आहे. त्याशिवाय आंध्रला विशेष दर्जा देण्यासाठीही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019