नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी येथे उपोषण सुरू केले असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फाङख अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव, शरद यादव आदी नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चंद्राबाबूंच्या मागणीला पाठिंबा दिला असून, त्या दिल्लीत त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत.चंद्राबाबू नायडू यांचे उपोषण व त्यांच्या मागण्या या निमित्ताने पुन्हा एकवार सारे विरोधक एका व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, तसेच दिग्वीजय सिंह, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, द्रमुकचे नेते टी. शिवा, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन हेही नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते.नायडू यांच्याबरोबर त्यांचे मंत्री उपोषणाला बसले आहेत. तसेच आंध्र प्रदेशातून हजारो लोक आंध्र भवनातील उपोषणस्थळी आले असून, अन्य राज्यातील तेलगू भाषिक लोकही पाठिंबा देण्यासाठी तिथे उपोषणाला बसले आहेत. नायडू यांनी सकाळी महात्मा गांधींच्या राजघाटावरील समाधीवर जाऊ न त्यांना आदरांजली वाहिली आणि नंतर एक दिवसाचे उपोषण सुरू केले. आंध्र प्रदेशला मोदी सरकार विशेष राज्याचा दर्जा देत नसल्याच्या निषेधार्थच नायडू यांचा तेलगू देसम पक्ष रालोआ तसेच मोदी मंत्रिमंडळातून बाहेर पडला होता.अस्मितेवरील हल्लासहन करणार नाहीचंद्राबाबू नायडू म्हणाले की, मोदी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करून घ्यायच्या हे आम्हाला माहीत आहे.हा आंध्रातील जनतेच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आमच्या अस्मितेवरील, हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही.
आंध्रच्या विशेष दर्जासाठी चंद्राबाबूंचे दिल्लीत उपोषण; सारे विरोधक स्टेजवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:33 AM