नवी दिल्ली- महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशनांनी रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण प्रतिस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर बिहारचं मधुबनी हे स्टेशन दुस-या स्थानी आहे. रेल्वे मंत्रालयानं आज याची माहिती दिली. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं या दोन्ही स्टेशनांवर राष्ट्रीय ताडोबा उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेतली चित्र रेखाटली आहेत.या प्रतिस्पर्धेत बिहारचं मधुबनी स्टेशन दुस-या क्रमांकावर आहे. स्थानिक कलाकारांनी पूर्ण स्टेशनला मधुबनी चित्रांनी नवा साज दिला. याशिवाय तामिळनाडू आणि मदुराई स्टेशनांनाही दुसरं स्थान मिळालं . तिसरा पुरस्कार संयुक्तरीत्या गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधल्या कोटा आणि तेलंगणातल्या सिकंदराबाद स्टेशनांना मिळाला आहे. पहिल्या स्थान पटकावलेल्या विजेत्या स्टेशनला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत.तर दुस-या स्थानी असलेल्या स्टेशनांना 5 लाख रुपये मिळणार आहेत. तिस-या स्थानी असलेल्या विजेत्या स्टेशनांना पुरस्काराच्या स्वरूपात 3 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. 2017मध्ये 'स्वच्छता हीच सेवा'च्या शेवटच्या दिवशी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्तानं मधुबनी रेल्वे स्थानकांवर मिथिला चित्रकला साकारण्यात आली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी विविध 20 विषयांवर कलाकारांच्या 20 टीम कार्यरत होत्या.
रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरणाच्या प्रतिस्पर्धेत महाराष्ट्रातली बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकं अग्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 10:18 PM