शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

चंद्रशेखर 'आझाद' यांच्या त्या दोन इच्छा राहिल्या अपूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 2:05 PM

चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानानंतर काही वर्षांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या हाती न लागलेल्या आझाद यांच्या दोन इच्छा मात्र अपूर्णच राहिल्या. 

नवी दिल्ली -  भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व  असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची आज जयंती. बालपणी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य लढयात सहभागी झालेल्या आझाद यांनी तरुणपणी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लझा उभारला होता. देशाला स्वातंत्र मिळावे ही आझाद यांची इच्छा होती. आझाद यांच्या बलिदानानंतर काही वर्षांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या हाती न लागलेल्या आझाद यांच्या दोन इच्छा मात्र अपूर्णच राहिल्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रशियाचा सर्वेसर्वा असलेल्या स्टॅलिन यांना भेटण्याची चंद्रशेखर आझाद यांची इच्छा होती. स्टॅलिन यांनी आपणास भेटीचे निमंत्रण दिले आहे, असे ते सांगत असत. पण रशियात जाण्यासाठी 1200 रुपये त्यांच्याकडे नव्हते. त्या काळी 1200 ही खूप मोठी रक्कम होती. मात्र एवढ्या रकमेची तरतूद करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. थोर क्रांतिकारक भगत सिंग हे चंद्रशेखर आझाद यांचे मित्र होते. भगत सिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी आझाद यांनी जंग जंग पछाडले. अनेकांच्या भेटी घेतल्या. मात्र भगत सिंग यांची फाशी टाळणे त्यांना शक्य झाले नाही. आझाद यांच्या मृत्युनंतर महिनाभरातच भगत सिंग यांना सुखदेव आणि राजगुरू यांच्यासह फाशी देण्यात आली.  

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या