बंगळुरू - चंद्राकडे झेपावलेले इस्रोचेचांद्रयान-2 ने आज महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर विक्रम वेगळा होईल. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे, असी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज सांगितले. चांद्रयान -2 यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आतापर्यंतच्या मोहिमेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मोहिमेतील पुढील टप्प्यांविषयी माहिती दिली. ''या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा 2 सप्टेंबर रोजी येईल. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत.'', असे सिवान यांनी सांगितले.
Chandrayaan-2: चंद्रावर लँडिंगचा मुहूर्त ठरला; ७ सप्टेंबरला 'ही' वेळ अचूक साधणार 'विक्रम'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:21 PM