बंगळुरू : चंद्राच्या पृष्ठभागावर पडून असलेल्या चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न ‘इस्रो’ने सोडून दिलेले नाहीत, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सूचित केले.तीनपेक्षा जास्त आठवड्यांपूर्वी विक्रम लँडर चंद्रावर अपेक्षितरीत्या उतरू शकले नव्हते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सात सप्टेंबर रोजी म्हटले होते की, विक्रम लँडरशी इस्रोचा असलेला संपर्क ते चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदरीत्या उतरण्याच्या काहीच मिनिटांपूर्वीच खंडित झाला होता. या लँडरमध्ये प्रग्यान रोव्हर ठेवण्यात आलेले होते.या घटनेपासून इस्रोचा लँडरशी संपर्क करण्याच्या सर्व शक्य मार्गांनी प्रयत्न सुरू होता; परंतु दहा दिवसांनंतर चंद्रावर रात्र झाल्यामुळे ते प्रयत्न थांबवण्यात आले. ‘आता ते शक्य नाही कारण तेथे आता रात्र सुरू आहे. कदाचित त्यानंतर आम्ही प्रयत्न पुन्हा सुरू करू. आमच्या लँडिंग साईटवर आता रात्र असल्यामुळे तेथे वीज असणार नाही’, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी मंगळवारी सांगितले. अनेक दिवसांनंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न हा कमालीचा कठीण वाटतो; परंतु तसे प्रयत्न करण्यात काही चुकीचे नाही, असे इस्रोच्या अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (वृत्तसंस्था)अंतराळतज्ज्ञांना काय वाटते?चंद्राच्या पृष्ठभागावर दिवस असताना आम्ही पुन्हा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. लँडर आणि रोव्हरवर जी कामगिरी सोपवली आहे तिचे आयुष्य हे एक चंद्र दिवस (लुनार डे) असेल आणि हा दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा आहे, असे इस्रोने चांद्रयान-२ चे उड्डाण करण्यापूर्वी सांगितले होते.चांद्रयान-२ ही अतिशय गुंतागुंतीची मोहीम असून, तिने चंद्राच्या आतापर्यंत न शोधण्यात आलेल्या दक्षिण धु्रवाच्या शोधासाठी आॅर्बिटर, लँडर आणि रोव्हरला एकत्र आणले होते. काही अंतराळतज्ज्ञांना विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क स्थापन होणे हे कमालीचे कठीण वाटतेआहे.
Chandrayaan 2 : विक्रम लँडरशी संपर्क साधणे इस्रोने सोडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:22 AM