बंगळुरू - भारताच्याचांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनेचांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले आहेत. तसेच जगभरात वसलेल्या भारतीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन दिले. इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केले आहे. ''आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे आभार. जगभरातील भारतीयांच्या अपेक्षा आणि स्वप्नांच्या बळावर आम्ही सातत्याने पुढे जात राहू,'' असे इस्रोनो आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. चांद्रयान मोहिमेच्या 47 व्या दिवशी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार होता. मात्र चंद्राच्या पृष्टभागापासून केवळ 2.1 किमी अंतरावर असताना त्याचा ऑर्बिटर आणि इस्रोशी असलेला संपर्क तुटला होता.
Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 8:55 AM
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान...
ठळक मुद्देचांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले आहेतजगभरात वसलेल्या भारतीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचे इस्रोने दिले आश्वासन