नवी दिल्ली: अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचे फोटो टिपला आहे. हा फोटो नासाकडून ट्विट करण्यात आला आहे. ७ सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोनं अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात इस्रोला अपयश आलं. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्यापासून 750 मीटर अंतरावर नासाला त्याचे तुकडे सापडले आहेत. विक्रमचे तीन मोठे तुकडे 2x2 पिक्सलचे आहेत. नासानं रात्री दीडच्या सुमारास विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला. लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरला विक्रमचे तीन तुकडे दिसल्याची माहिती नासानं ट्विटमधून दिली.
Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 7:25 AM