चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या इस्रोच्याचांद्रयान-2 ने आज आपल्या प्रवासातील अजून एक मोठा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज सकाळी चांद्रयान -2 यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत दाखल झाले, अशी माहिती इस्रोने ट्विट करून दिली. तसेच याबाबत अधिक माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमधून देतील, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बंगळुरूस्थित केंद्रातून या यानाच्या स्थितीवर नजर ठेवली जात आहे. चांद्रयान २ च्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत, असे इस्रोने सांगितले आहे. आता चांद्रयान - 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर चंद्राबाबत आतापर्यंत समोर न आलेल्या बाबींबर प्रकाश पडणार आहे.