बंगळुरू : चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे झेपावणाऱ्या चांद्रयान२ चे उड्डाण आयत्या वेळी उद््भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले होते.श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर ५२ दिवसांनी चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. चांद्रयान-२चे या आधी प्रक्षेपण करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावेळी निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी इस्रोचे अभियंते व शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.>रोव्हरची भूमिकाचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजे दडली आहेत, तिथे पाण्याचा अंश आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिथे चांद्रयान-२मधील रोव्हरने केलेल्या तपासणीनंतर मिळतील.
चांद्रयान-२चे प्रक्षेपण २१ किंवा २२ जुलै रोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:40 AM