स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंतचा भारताचा अंतराळ कार्यक्रम प्रवास अतिशय संघर्षपूर्ण आहे. सायकल आणि बैलगाडीने सुरू झालेला हा प्रवास मंगळ व चंद्रापर्यंत पोहोचला आहे. इस्रो ही जगातील ६ मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे. भारताच्या औपचारिक अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात २१ नोव्हेंबर, १९६३ रोजी थुंबा येथून पहिले रॉकेट ‘नाइक अपाचे’ने झाली. अमेरिकेने तयार केलेले रॉकेटचे विविध भाग बैलगाड्या आणि सायकलवरून प्रक्षेपणस्थळी नेण्यात आले होते.
१९८३ - इनसॅट-१बीला प्रक्षेपित करण्यात आले. यामुळे देशात दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामानाचा पूर्वअंदाज या क्षेत्रात क्रांती घडून आली.
१९९३ - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही)च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे स्वदेशी प्रक्षेपण क्षमतेत वाढ झाली. याद्वारे ५० हून अधिक यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
२२ ऑक्टोबर, २००८ - १,३८० किलोग्रॅमचे चंद्रयान-१ पाठविण्यात आले, ते १४ नोव्हेंबर, २००८ रोजी चंद्रावर पोहोचले. भारत चंद्रावर झेंडा रोवणारा चौथा देश बनला. चंद्रयान-१नेच पाणी असल्याचा शोध लावला.
२०१४ - इस्रोने मंगळयानाला मंगळावर उतरवून एक नवा विक्रम केला. असे करणारा भारत हा चौथा देश बनला. यासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च आला होता.
२०१८ - ११ एप्रिल रोजी इस्रोने आयआरएनएसएस नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला. हा उपग्रह स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला होता.
२०१९ - अँटी-सॅटेलाइटच्या माध्यमातून एक उपग्रह नष्ट करून २७ मार्च रोजी इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी केली.
१ एप्रिल २०१९ - इस्रोने इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस उपग्रहासह एकाच वेळी २९ उपग्रह प्रक्षेपित केले.२८ विदेशी उपग्रहांचा समावेश होता.
२२ जुलै २०१९ - भारताने दुसरी चंद्र मोहीम चंद्रयान-२ प्रक्षेपित केली. मात्र, हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही.
आव्हाने काय आहेत?
- अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव
- मानवी अंतराळ उड्डाणासाठी लाँच व्हेइकल प्रक्षेपित करण्याचा अभाव
- श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात तांत्रिक कार्यक्षमतेचा अभाव
- खासगी क्षेत्राची मर्यादित भूमिका
- प्रकल्पांची संथ अंमलबजावणी
इस्रोचे भविष्यातील मिशन काय?
- सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचे मिशन आदित्य-१ला प्रक्षेपित करण्याची योजना
- २०३० पर्यंत भारताचे आपले स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचीही योजना आखली आहे.
- २०२४ मध्ये पहिले मानव मिशन ‘गगनयान’ पाठविण्याची तयारी सुरू आहे. सर्वात मोठे रॉकेट जीएसएलव्ही मार्क -III द्वारे प्रक्षेपित केले जाईल.
आणखी काही विक्रम
- १९९९ पासून इस्रोने आतापर्यंत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही) वापरून ३४ देशांचे ३४५ परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत.
- १८,०००+ कामगारांसह, इस्रो अंतराळ आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत नवीन टप्पे निर्माण करत आहे.
- ४२४ विदेशी उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. यातील ३८९ गेल्या केवळ ९ वर्षांमध्ये सोडण्यात आले.
- १४० स्टार्टअप अंतराळ क्षेत्रात देशभरात कार्यरत आहेत.
- ११४ उपग्रह आतापर्यंत भारताने प्रक्षेपित केले आहेत.
- १३,७०० कोटी रुपये हे अंतराळ कार्यक्रमासाठी भारताचे सध्याचे बजेट आहे.
- ३६,७९४ कोटी रुपये ही देशाचे अंतराळ अर्थव्यवस्था असून, ती देशाच्या जीडीपीच्या १% पेक्षाही कमी आहे.