भारताच्या चंद्रयानाने जगाला अनेक नव्या गोष्टी दिल्या आहेत. चंद्रयानाकडे आणखी नऊ दिवस संशोधनासाठी आहेत, आता चंद्रयान ३ ने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. चंद्रयान-3 च्या रोव्हर प्रज्ञान वरील पेलोडने चंद्रावर सल्फर असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर, रोव्हरवरील आणखी एका उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात एका वेगळ्या तंत्राद्वारे सल्फरच्या उपस्थितीची पुष्टी केली.
इस्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) ने सल्फर तसेच इतर किरकोळ घटक शोधले आहेत. "CH-3 चा हा शोध शास्त्रज्ञांना या प्रदेशातील सल्फरच्या स्त्रोतासाठी नवीन स्पष्टीकरण विकसित करण्यास भाग पाडतो. मग ते अंतर्गत अस्तित्वात असले तरी, ज्वालामुखी किंवा उल्कापिंडामुळे उद्भवणारे आहेत.
ना IIT, IIM, IIIT, NIT, 'या' कॉलेजमधून शिक्षण घेतलं, आता गुगुलनं दिलं १ कोटींचं पॅकेज
इस्रोने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये १८ सेमी लांब APXS फिरवत असलेली स्वयंचलित बिजागर यंत्रणा दाखवली आहे, जी चंद्राच्या पृष्ठभागाच्या ५ सेमी वर डिटेक्टर हेड स्थिर करते. APXS PRL, अहमदाबाद यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. URSC, बेंगळुरूने एक उपयोजन यंत्रणा विकसित केली आहे.
प्रज्ञान रोव्हरचा आणखी एक व्हिडीओ शेअर करताना इस्रोने लिहिले आहे की, "सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हर फिरवण्यात आला. रोटेशन लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपले होते. "चंदामामाच्या अंगणात एखादे लहान मूल खेळत आहे, तर आई प्रेमाने पाहते आहे. नाही का?", असं ट्विटमध्ये म्हटले आहे.