बंगळुरू : चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर झाेपी गेलेेले विक्रम राेव्हर आणि प्रग्यान लँडर यांना जागे करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. चंद्रावर सूर्योदय व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या तरी त्यात अपयश आले आहे. इस्रो आता विक्रम व प्रग्यानशी शनिवारी (दि. २३) संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.
चंद्रावर १४ दिवसांचे दिवस आणि रात्र असतात. इस्रोने सूर्यास्तानंतर ४ सप्टेंबर रोजी लँडरला, तर त्या आधी २ सप्टेंबर रोजी रोव्हरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. इस्रोने लँडर-रोव्हरचे रिसिव्हर्स सुरू ठेवले आहेत. १४ दिवसांच्या अंधारानंतर सूर्यप्रकाश पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी दोघांना जागे करून संपर्क स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांकडून कोणतेही सिग्नल प्राप्त झाले नाही. इस्रोने ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली. आता दोघांशी संपर्क करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी ही माहिती दिली. (वृत्तसंस्था)
का टाकले हाेते स्लीप माेडवर? उणे १२० ते २०० अंश सेल्सिअसपर्यंत चंद्रावरील तापमान सूर्यास्तानंतर घसरते. अशा स्थितीत विक्रम आणि प्रग्यानची यंत्रणा खराब हाेण्याची भीती आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सूर्याेदय हाेईल. त्यानंतर दाेघांचे साेलर पॅनल पुन्हा पूर्णपणे चार्ज हाेतील. त्यामुळे आता दाेघांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
अपेक्षा वाढल्या : केवळ १४ दिवसच विक्रम आणि प्रग्यान काम करू शकतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, आता सूर्याेदयानंतर ते जागे झाल्यास आणखी १४ दिवस त्यांच्यामार्फत काही प्रयाेग केले जातील आणि आणखी माहिती मिळेल, अशी अपेक्षा आहे.