लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून इतिहास घडविला. भारताचे चांद्रयान चंद्रावरील सर्वात जुन्या विवरामध्ये उतरल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. हे विवर सुमारे ३.८५ अब्ज वर्षांपूर्वी बनले हाेते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चांद्र माेहीम आणि उपग्रहाने पाठविलेल्या विविध छायाचित्रांचे विश्लेषण करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाैतिक संशाेधन प्रयाेगशाळा व ‘इस्राे’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या विवरात चांद्रयान उतरले आहे, ते ‘नेक्टरियन’ काळात बनले हाेते. प्रयाेगशाळेचे ग्रहविज्ञान विभागाचे सहयाेगी प्राध्यापक एस. विजयन यांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या ठिकाणी चांद्रयान-३ उतरले आहे, ते एक अद्वितीय भूगर्भीय ठिकाण आहे. तेथे दुसरे मिशन पाेहाेचले नाही.
कशी हाेते विवरांची निर्मिती?ज्वालामुखींचे स्फाेट किंवा उल्कापिंड धडकल्यामुळे झालेल्या खड्ड्यांना क्रेटर किंवा विवर म्हणतात. त्यातून निघालेली माती किंवा इतर वस्तूंना इजेक्टा म्हणतात. चांद्रयान २६ ऑगस्ट २०२३ राेजी जिथे उतरले, त्या स्थळाला शिवशक्ती पाॅइंट असे नाव देण्यात आले हाेते.
कसा विकसित झाला चंद्र?nया ठिकाणी प्रग्यान राेव्हरने जी छायाचित्रे घेतली, त्यावरून चंद्र कसा विकसित झाला, हे लक्षात येते. चांद्रयान-३ हे सुमारे १६० किलाेमीटर व्यासाच्या विवरात उतरले हाेते. nप्रग्यानच्या छायाचित्रात जे दिसले ताे कदाचित विवराचा अर्धा भाग असावा. उर्वरित भाग दक्षिण ध्रुवाच्या ‘ऐटकेन बेसिन’मधून निघालेल्या इजेक्टामध्ये दबला असावा, असे विजयन यांनी सांगितले.