Chandrayaan 3 Mission: भारताची महत्वकांशी चंद्र मोहीम यशस्वी झाली असून, चंद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर परीक्षणही सुरू केले आहे. इस्रोने सोमवारी (28 ऑगस्ट) रोव्हरचे काही फोटो शेअर केले, ज्यात हा एका मोठ्या खड्ड्याजवळ जाताना दिसतोय. फोटो शेअर करत इस्रोने म्हटले की, "27 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर त्याच्या स्थानापासून 3 मीटर अंतरावर असलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले होते. पण, नंतर रोव्हरने सुरक्षितपणे नवीन मार्ग पकडला आहे."
चंद्राच्या पृष्ठभागाचा आलेख रविवारी इस्रोने एक आलेख प्रसिद्ध केला होता. यात चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर मोजलेल्या तापमानातील फरक सांगितला. इस्रोने जारी केलेल्या आलेखामध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान -10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याचे दिसले. इस्रोने सांगितले की, अवकाश विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण केले. पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी पर्यंत तापमानात फरक होता.
23 ऑगस्ट रोजी लँडिंग 23 ऑगस्ट, हा दिवस भारतासाठी फार महत्वाचा दिवस आहे. त्या दिवसी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद लँड झाले. दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत जगातील पहिला देश आहे. यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आणि त्याने आपले काम सुरू केले. इस्रो याबाबतचे विविध अपडेट वेळोवेळी देत आहे.