भारताच्या इतिहासात आज एका अत्यंत आनंदाच्या आणि गौरवाचा क्षणाची नोंद झाली. भारताच्या इस्त्रोने पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले. चंद्रयात-3 आज चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीपणे उतरले आणि भारताचा तिरंगा ध्वज चंद्रावर फडकला. म्हत्वाचे म्हणजे चंद्राच्या दक्षिण धृवावर पाय ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना, "लँडर मोड्यूल सुरक्षितपणे चंद्रावर लॅंड झाले आहे. ही आपल्या साठी गर्वाची गोष्ट आहे. हिंदीत एक म्हण आहे, 'चंदा मामा दूर के', मात्र आता आपण म्हणून शकतो, 'चंदामामा अपने घर के', असे सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस तथा इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी म्हटले आहे.
चंद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम होती. चांद्रयान-3 मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितपणे उतरला आणि इस्रोतील शास्त्रज्ञांसह देशातील कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला....अन् जगाच्या इतिहासात भारताच्या नाव आज सुवर्णाक्षरांनी कोरले गेले -गेल्या 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 हे यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने झेपावले होते. यानंतर एकएक टप्पा पार करत हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. अखेर आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागावर उतरले आणि जगाच्या इतिहासात भारताच्या नावे हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. तसेच चंद्रावर यान उतरवण्यात भारत आहे अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.