नवी दिल्ली - भारत आता चंद्रावर जाण्याची तयारी करत आहे. चांद्रयान ३ ला लवकरच चंद्रावर पाठवण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. इस्त्रो(ISRO) येत्या जुलै महिन्यात चांद्रयान ३ लॉन्च करणार आहे. परंतु ISRO ने याबाबत तारीख निश्चित केली नाही. चांद्रयान ३ च्या प्रक्षेपण भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सर्वात मोठी कामगिरी असेल.
इस्रोच्या वैज्ञानिकांनी आज जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलद्वारे नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 लाँन्च केले आहे. पूर्वनिश्चित वेळेनुसार सकाळी १०.४२ वाजता ते आपल्या टार्गेटकडे रवाना झाले. त्याचवेळी चांद्रयान ३ बाबत इस्त्रोने सांगितले की, सर्वकाही ठीक राहिले तर येत्या जुलै महिन्यात Chandrayan-3 लॉन्च केले जाऊ शकते.
याआधी इस्त्रोच्या काही अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात चांद्रयान ३ लॉन्च करण्याबाबत आवश्यक परिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे सांगितले. अंतराळात या यानला लॉन्च करतेवेळी होणारी कंपन आणि ध्वनिक वातावरण संतुलित ठेवण्यासाठी क्षमतेची पूर्तता केली. हे निरिक्षण विशेष म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक मानले जात होते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची घोषणा चांद्रयान-२ च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी करण्यात आली आहे. चांद्रयान-३ मोहीम जुलैमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सूर्याच्या वैश्विक किरणांपासून संरक्षित असलेल्या चंद्राच्या बाजूला प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे. मिशनची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची पुष्टी इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.
चांद्रयान-२ मोहीम २०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर या तीन वेगवेगळ्या यंत्रणांचे हे मिशन अद्वितीय संयोजन होते. ऑर्बिटरने योग्यपणे काम केले आणि स्वतःला चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापित केले. परंतु चंद्राच्या दूरच्या बाजूला क्रॅश झाल्याने मोहिमेचे लँडर आणि रोव्हर युनिट हरवले. भारतीय अंतराळ संस्था तिच्या किफायतशीर दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. चांद्रयान-३ सह फक्त एक लँडर आणि एक रोव्हर प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा उद्देश नवीन चंद्र मोहिमेसाठी चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरचा पुनर्प्रयोग करण्याचा आहे.