ठळक मुद्देचंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २६५० किलोमीटर अंतरावरून हा फोटो टिपण्यात आला आहे. टिपलेल्या या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत.
नवी दिल्ली - भारताच्या अवकाश मोहिमांमधील एक महत्त्वाकांक्षी आणि सर्व भारतीयांचे लक्ष लागलेला प्रकल्प असलेल्या चांद्रयान - २ ने टिपलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्थाने (इस्त्रो) प्रथमच प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २६५० किलोमीटर अंतरावरून हा फोटो टिपण्यात आला आहे. चांद्रयान - २ ने विक्रम रोव्हर लँडरने २१ ऑगस्ट रोजी हा फोटो टिपला आहे. टिपलेल्या या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत.