नवी दिल्ली : ‘देशाचे भाग्य बदलायचे असेल तर सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे भाग्य बदलावे लागेल. राज्यात त्यासाठी विकास कार्यक्रमांचा वेग वाढवावा लागेल. उत्तर प्रदेशात राजकीय विरोधातून केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना अडवल्या जातात’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लखनौमध्ये सोमवारी मोदी यांची विराट सभा झाली. या सभेने उत्तर प्रदेशात भाजपच्या परिवर्तन यात्रा मालिकेचा समारोपही झाला. मोदी यांनी योजना अडविल्या जातात याचा उल्लेख करताना (इंदिरा गांधींच्या मैं कहती हूं गरीबी हटाओ और वो कहते है इंदिरा हटाओ) या गाजलेल्या वाक्याची आठवण करून देणारे वाक्य ऐकवले. ते म्हणाले, एकीकडे समाजवादी आणि बसप हे दोन परस्पर विरोधी पक्ष हातात हात घालून मला विरोध करीत आहेत. ते मोदी हटाओच्या घोषणा देत आहेत तर मी देशातून काळे पैसे हटवण्यासाठी शुद्धीयज्ञ आरंभला आहे.’’ उत्तरप्रदेशात गुंडगिरीची व्यापकता वाढली आहे. राज्यात सुशासन पर्व सुरू करायचे असेल तर भाजपच्या हाती सत्ता सोपवा, असे आवाहन मोदींनी केले.
देशासाठी उत्तर प्रदेशचे भाग्य बदला
By admin | Published: January 03, 2017 4:14 AM