मानसिकता बदला, विकास निश्चितच होईल बांगर यांचे मार्गदर्शन : दोन हजार रुपयात शोषखड्डा निर्मिती शक्य
By admin | Published: March 18, 2016 12:14 AM
जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.
जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले. कांताई सभागृहात गुरुवारी शोषखड्डा व भूमीगत गटार निर्मितीबाबत सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा झाली. त्या वेळी बांगर हे शोषखड्डा निर्मितीसंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. अध्यक्ष प्रयाग कोळी, सभापती नीता चव्हाण, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे आदी उपस्थित होते. दोन हजारात शोषखड्डाजेथे गटार बांधणे शक्य नाही किंवा इतर कारणे आहे तेथे शोषखड्डा तयार करता येईल. २० इंच व्यास व साधारणत: १० फूट खोल खड्डा करून त्यात वरून पाईपद्वारे सांडपाणी सोडता येईल. या खड्ड्याला आजूबाजूने सिमेंटचे आवरण असते. फक्त दोन हजार रुपयात हा खड्डा तयार करता येईल. त्यात सांडपाणी सोडून भूगर्भात पाणी जिरविता येईल यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटू शकतो, असेही ते म्हणाले. त्यांनी साक्री तालुक्यात विविध ग्रा.पं.अंतर्गत झालेल्या शोषखड्ड्यांबाबतची सचित्र माहिती दिली. निम्मे पदाधिकारी अनुपस्थितया कार्यशाळेला उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मीना पाटील, दर्शना घोडेस्वार हे अनुपस्थित राहीले. ग्रामविकासाचे मॉडेल विकसित व्हावेसीईओ पांडेय म्हणाले, सरपंच व ग्रामसेवक यांनी आपले गाव मॉडेल म्हणून विकसित करावे. त्यासाठी प्रथम मानसिकता बदलावी लागेल. मनरेगातून अकुशल कामे फारशी होत नाहीत. या अकुशल कामांच्या माध्यमातून मध्य प्रदेशात कृषि विकास दर १० टक्के मिळविणे शक्य झाले आहे. दरवर्षी तेथे मनरेगातून शेतीसाठी प्रचंड काम केले जाते. पण आपल्याकडे कुशल कामांवर अधिक भर असतो. त्यामुळे मनरेगाच्या कुशल, अकुशल कामांबाबत ताळमेळ राहत नाही व विकासाचा समतोलही साधला जात नाही. मनरेगा विकास करण्याची मोठी योजना आहे. ती समजून घेतली पाहीजे. वर्षभराच्या कामांचा आराखडा, नियोजन त्यातून सादर केले जावे. पण जी योजना पुढे येते, त्याबाबत नकारात्मक विचार पसरविले जातात. यामुळे कामाची गती मंद असते, असेही पांडेय म्हणाले.