ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सोशल मीडियावर सध्या मॅनेक्विन चँलेंजचा ट्रेंड सुरु आहे. व्हाईट हाऊसपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच या चँलेंजमध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येकाने वेगवेगळ्या थीमच्या आधारावर मॅनेक्विन चँलेंज पुर्ण करत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केले. हे मॅनेक्विन चँलेंज नक्कीच मनोरंजक आहे, मात्र ख-या आयुष्यात मॅनेक्विन राहणं कितपत योग्य आहे ? असा सवाल सध्या सोशल मीडियावर विचारण्यात आला आहे. या मॅनेक्विन चँलेंजच्या माध्यमातूनच बंगळुरु विनयभंगाच्या घटनेवर भाष्य करत हा प्रश्न उपस्थित केला आहे.
AutumnWorldwide ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बंगळुरुत नववर्षाच्या पुर्वसंध्येला भररस्त्यावर झालेल्या तरुणी आणि महिलांच्या विनयभंगावर यामधून आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातील सर्वजण मॅनेक्विन चँलेंजप्रमाणे एका जागी शांत उभे आहेत. मात्र शेवटला ट्विस्ट देत दोन तरुण एक तरुणीचा विनयभंग करताना दाखवण्यात आले आहेत.
ही तरुणी हातात कार्ड घेऊन ब्रिगेड रोडवर 60 हजार लोक होते, यामधील एक हजार विनयभंग करणार होते. तर 59 हजार लोक मॅनेक्विन होते असं सांगत मॅनेक्किन म्हणजे मूकदर्शक होऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे.