चरणजितसिंग चन्नी की नवज्योतसिंग सिद्धू, कोण असेल काँग्रेसचा चेहरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:25 AM2022-02-04T08:25:02+5:302022-02-04T08:26:04+5:30
या सर्वेक्षणात विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू या दोघांबाबत पंजाब काँग्रेसमध्ये कल काय आहे याची पाहणी करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेसतर्फे चरणजितसिंग चन्नी हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे. त्यासाठी त्या पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापेक्षा चन्नी यांनाच अधिक पसंती देण्यात आल्याचे कळते. त्याप्रमाणे काँग्रेसने निर्णय घेतल्यास विद्यमान मुख्यमंत्री चन्नी यांनी सिद्धू यांच्यावर मात केल्याचे चित्र दिसून येईल.
या सर्वेक्षणात विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू या दोघांबाबत पंजाब काँग्रेसमध्ये कल काय आहे याची पाहणी करण्यात येत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येकाला पंजाबीतून तीन प्रश्न विचारण्यात येतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांच्याबाबत या सर्वेक्षणात मत अजमावण्यात आले नाही. या सर्वेक्षणात पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोण उमेदवार असावा याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार, आमदार, खासदार, सामान्य माणसे यांची मते जाणून घेतली.