नवी दिल्ली : आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा लोकसभेच्या ५४३ जागांपैकी प्रत्येक जागेसाठी पक्षप्रभारीची नियुक्ती करणार आहे. त्याशिवाय निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येक राज्यात पक्षातर्फे ११ जणांची समिती स्थापन करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.लोकसभा जागेसाठी नियुक्त केलेला प्रभारी हा अन्य मतदारसंघातील असेल. राज्यामध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या समितीला निवडणुक तयारी गट असे नाव देण्यात आले असून तिला १३ कामे ठरवून दिली आहेत. अशा प्रकारे भाजपाकडून प्रभारी नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र या पद्धतीचे काम बहुजन समाज पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.प्रत्येक राज्यातील राजकीय स्थिती, सामाजिक प्रश्न, कोणत्या पक्षाबरोबर आघाडी होऊ शकते, केंद्र सरकारच्या लाभार्थींची नावे याचा एक सविस्तर अहवाल राज्यातील अकरा जणांच्या समितीने पक्षाध्यक्षांना सादर करायचा आहे.भाजपमध्ये येऊ इच्छिणाºयांची पार्श्वभूमी देखील ही समिती तपासणार आहे. ज्या राज्याला शहा भेट देतील त्याच् आधी हे सारे तपशील समितीने आपल्या हाताशी ठेवायचे आहेत. प्रत्येक लोकसभा जागेसाठी एक प्रभारी नेमण्याबरोबरच सोशल मिडियातील प्रचारासाठी तीन तज्ज्ञ माणसे तसेच प्रसारमाध्यमांशी समन्वय साधण्याकरिता तीन माणसे व केंद्र, राज्य सरकारच्या योजनांची नीट अंमलबजावणी होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन माणसांचीही पक्षाकडून नियुक्ती केली जाणार आहे.शहा करणार सर्व राज्यांचा दौरामोदी व शहा यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी देशव्यापी दौºयाला १० जून रोजी छत्तीसगढपासून सुरुवात केली. सर्व राज्यांना जुलैै अखेरपर्यंत भेटी देऊन पक्षातर्फे करण्यात आलेल्या निवडणुक पूर्वतयारीचा शहा आढावा घेतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बसपाने तर कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर व काँग्रेसने भाजपासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेही भाजपाने निवडणुक पूर्वतयारीसाठी सर्वांच्या आधी आक्रमक पावले टाकली आहेत.
लोकसभा जागांसाठी भाजपा प्रभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 3:11 AM