ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - हरियाणातील रोहतकमध्ये आम आदमी पार्टीच्या रॅलीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या दिशेनं एका तरुणानं बूट भिरकावला आहे. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी या तरुणाला पकडून बेदम चोप दिला आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी व्यासपीठावर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर या तरुणानं बूट फेकला. त्यानंतर केजरीवालांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
(नोटाबंदी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा - अरविंद केजरीवाल)
केजरीवाल ट्विच्या माध्यमातून म्हणाले, मोदी भित्रे आहेत, स्वतःच्या चमच्यांकडून माझ्यावर बूट फेकून घेतात. आम्हीही हे करू शकतो, मात्र आमच्यावर तसे संस्कार नाहीत. तुम्ही बूट फेका किंवा सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावा, तरीही नोटाबंदी घोटाळा आणि सहारा, बिर्लाकडून घेतलेल्या लाचखोरीचे सत्य मी जगासमोर उघड केल्याशिवाय शांत बसणार नाही. केजरीवालांनी या बूटफेकीच्या घटनेमागे मोदींचा हात असल्याचा आरोप केला आहे.
मैंने कहा था मोदीजी कायर हैं। आज अपने चमचों से जूता फिंकवाया।मोदीजी, हम भी ये कर सकते हैं पर हमारे संस्कार/तहज़ीब हमें इजाज़त नहीं देते(1/2)— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 1 January 2017
आप चाहे जूता फिंकवाओ या CBI रेड कराओ, नोटबंदी घोटाले और सहारा बिरला रिश्वतख़ोरी का सच मैं बताता रहूँगा(2/2)— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 1 January 2017