ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मुझफ्फरनगर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शहा यांच्यावर धर्म, जातीच्या आधारे दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा, तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत शहा अपमान व बदला घेण्याबद्दल बोलले होते. ' अपमानाचा बदला घेण्याची तसेच अन्याय करणा-यांना धडा शिकवायची गरज आहे, असे ते म्हणाले होते.