शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मुलगी बनून फोनवरून वर्षभर मारल्या गप्पा, ‘ड्रीम गर्ल’ समोर येताच तरुणाला बसला ४४० व्होल्टचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 11:24 AM

Crime News: फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने तरुणीचा आवाज काढून एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

छत्तीसगडमधील जशपूर येथून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने तरुणीचा आवाज काढून एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जवळपास दीड वर्ष त्याच्यासोबत प्रेमाचं नाकं केलं. एवढंच नाही तर त्याला लग्नाचीही ऑफर दिली. जेव्हा हा शिक्षक पूर्णपणे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढला गेला आहे याची खात्री पटली तेव्हा या लबाडाने त्या शिक्षकाकडून तब्बल ५ लाख ६० हजार रुपये उकळले.

पीडित शिक्षकाने सांगितले की, त्याने मला भेटायला बोलावले. पहिल्यांदा आपल्या ड्रीम गर्लला भेटण्यासाठी जायचं असल्याने मी खूप उत्साहित होतो. मी तिच्यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले होते. मात्र मला जेव्हा समजले की माझी प्रेयसी मुलगी नाही तर मुलगा आहे, तेव्हा मला धक्का बसला. त्यानंतर मी त्वरित याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी सांगितले की, पीडित शिक्षक विद्याचरण पैकरा रायगड जिल्ह्यातील लैलुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. त्याने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तपासामध्ये विद्याचरण हा जिला आपली प्रेयसी समजून फोनवर बोलायचा ती मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर आले. या तरुणाने ड्रीम गर्ल बनून शिक्षकासह अनेकांना ब्लॅकमेल केलं आहे.

विद्याचरण पैकरा याने आपल्या तक्रारीत सांगितले की, नोव्हेंबर २०२१  मध्ये त्याची ओळख सरिता पैकरा नावाच्या तरुणीशी झाली होती. स्वत:ची ओळख सविता अशी करून देणाऱ्या आरोपीने आपण धरमजयगड ब्लॉकमध्ये शिक्षक असल्याचे सांगितले. सदर आरोपी मुलीचा आवाज एवढा हुबेहूब काढण्यात पटाईत होता की समोरचा त्याच्या आवाजाच्या जादूमध्ये फसून जायचा.

आरोपीने तरुणी बनूव फिर्यादीकडून ५ लाख रुपयांहून अधिकची रक्कम उकळली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ४२० आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास करून पुढील कारवाई केली जाईल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडTeacherशिक्षक