शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

नोटाबंदीतून रोकड वाचविण्यासाठी क्लृप्त्या, लोकांचे अचाट प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:26 AM

वर्षापूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आर्थिक तोट्यातून आपला बचाव करण्यासाठी देशातल्या विविध संस्था, कंपन्या आणि व्यक्तींनी कोणकोणते अचाट प्रयोग केले

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : वर्षापूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आर्थिक तोट्यातून आपला बचाव करण्यासाठी देशातल्या विविध संस्था, कंपन्या आणि व्यक्तींनी कोणकोणते अचाट प्रयोग केले, जुन्या नोटांमधली काळी कमाई दडविण्यासाठी काय क्लृप्त्या केल्या, याचा पर्दाफाश करणारा एक २७ पानी खास अहवाल प्राप्तिकर विभागाने तयार केला आहे. नोटाबंदीनंतर बेकायदेशीर व्यवहारांद्वारे आपल्याकडील जुन्या नोटांची रोकड ज्यांनी जिरवल्याचा आरोप करता येईल, अशा देशातल्या १७ लाख ९२ हजार लोकांना प्राप्तिकर विभागाने हुडकून काढले आहे.प्राप्तिकर विभागाच्या अहवालात ज्या ठळक मुद्द्यांचा समावेश आहे, त्यात नमूद केले आहे की, आॅपरेशन क्लीन मनीच्या काळात विविध बँकांमधे संदिग्धरीत्या ज्या रकमा जमा होत होत्या, त्यावर प्राप्तिकर खात्याची बारीक नजर होती. अनेक व्यावसायिकांनी आपल्याकडच्या जुन्या नोटा खपविण्यासाठी आपापल्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये बदल करीत जुन्या तारखांवरील व्यवहाराच्या नोंदी केल्या.सरकारतर्फे बँकांमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी अथवा रक्कम जमा करण्यासाठी विशिष्ट कालावधी ठरवण्यात आला होता. अनेक पेट्रोल पंप मालकांनी या काळात दररोजच्या रोख विक्रीचे आकडे अवास्तवरीत्या फुगवले व ती रक्कम जुन्या नोटांद्वारे बँकांत जमा केली. काळे पैसे पांढरे करण्यासाठी देशातल्या २ लाखांपेक्षा अधिक बनावट (शेल)कंपन्यांचा सर्रास वापर करण्यात आला. संदिग्ध व्यवहारांद्वारे त्यात मोठ्या रकमांची उलाढाल दाखवली गेली.मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे, हा नियम पूर्वीपासून अंमलात होता. नोटाबंदीनंतर त्यातून वाचण्यासाठी सराफ, ज्वेलर्स, बुलियन ट्रेडर्स आदींनी छोट्या रकमांची अनेक खरेदी विक्री बिले तयार केली. व्यापार उद्योगातल्या व्यावसायिकांनी काही रकमा अशा व्यवहारांद्वारे अनेकवेळा फिरवल्या की, त्याच्या प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत प्राप्तिकर विभागाला पोहोचताच येऊ नये. भविष्यात होणाºया व्यवहारांपोटी अनेक व्यावसायिकांनी जुन्या नोटांमध्ये अ‍ॅडव्हान्स स्वीकारल्याचे दाखवून जुन्या नोटा रितसर बँकांमधे जमा केल्या.देशातल्या प्रमुख सहकारी बँकांकडे ग्राहकांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी करन्सी चेस्टमधून सुरुवातीला नव्या नोटांचा पुरवठा करण्यात आला होता. सहकारी बँकांचे व्यवस्थापन मंडळ व उच्चपदस्थ अधिकाºयांनी, करन्सी चेस्टमधून मिळालेल्या नव्या नोटा ग्राहकांना देण्याऐवजी त्यांचा वापर स्वत:च्या अथवा हितसंबंधितांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी केला. नोटाबंदीनंतर आॅपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात बहुसंख्य व्यापाºयांनी आपल्या खात्यांत मोठ्या रकमांचा जो भरणा केला. त्याचा खुलासा करताना या रकमा रोख खरेदी विक्रीच्या व्यवहारांतून आल्याचा दावा केला.नोटाबंदीच्या निर्णयापूवीच्या रोख व्यवहारांशी यांची तुलना करता, जमा झालेल्या रकमांपैकी केवळ २0 टक्के रकमेचे व्यवहार या व्यापाºयांकडून पूर्वी होत होते, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या हाती आली आहे.नोटाबंदीनंतर संदिग्ध व्यवहारांच्या आधारे ज्यांनी बँकांमधे जुन्या नोटांची रोकड जमा केली, अशा १७.९२ लाख लोकांना आयकर विभागाने हुडकून काढले आहे. त्यातल्या ९.७२ लाख करदात्यांनी जवळपास २.८९लाख कोटी रुपयांचा खुलासा आॅनलाइन माध्यमातून प्राप्तिकर विभागाकडे केला.त्यांच्यावरकारवाई होईल?नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला८ नोव्हेंबर रोजी देशभर सत्ताधारी आणि विरोधकांत बरेच रणकंदन माजले.प्राप्तिकर विभागाकडूनप्राप्त झालेल्या ताज्या अहवालानंतर यापैकी किती संस्था व लोकांवर कारवाई करण्याची धमक दाखविली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी