नवी दिल्ली - सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. अनेकजण दर महिन्याला रिचार्जची झंझट नको म्हणून एकाचवेळी वर्षभराचे रिचार्ज करून टाकतात. युझर्सच्या या गरजांचा विचार करून बीएसएनएलने अगदी किफायतशीर प्लॅन समोर आणला आहे. या प्लॅनमध्ये युझरला अनलिमिटेड डाटा, कॉलिंग, एसएमएस यासह अनेक फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये नेमकं काय आहे, याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
बीएसएनएलच्या १४९९ रुपयाच्या प्लॅनमध्ये युझर्सला २४ जीबी डेटा दिला जाणार आहे. तर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सेवा दिली जाईल. तसेच दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ही ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा केवळ १२५ रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच बीएसएनएलचा २३९९ रुपयांचा प्लॅनही आणला आहे. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. तसेच यामध्ये ७५ दिवसांची अतिरिक्त वैधताही मिळते. यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग देण्यात आली आहे. तसेच १०० एसएमएस प्रतिदिन दिले जात आहेत. तर ३जीबी दैनंदिन डाटा दिला जातो. या प्लॅनची एकूण वैधता ही ४४० दिवसांची आहे. यामध्ये युझरला इरॉस नाऊ एंटरटेन्मेंट सेवेचे सब्स्क्रिप्शन दिले जाते. याचा दर महिन्याचा खर्च सुमारे १९९ रुपये एवढा पडतो.
बीएसएनएलचा १ हजार ९९९ रुपये एवढी आहे. यामध्ये युझरला ६००जीबी डाटा दिला जातो. तसेच डाटा लिमिट संपल्यावर युझर्सला ८०केबीपीएस स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रतिदिन दिले जातील. यामध्ये इरॉस नाऊ एंटरटेन्मेंट सर्व्हिसचा अॅक्सेसही दिला जाईल. त्याचा दर महिन्याचा खर्च हा सुमारे १६६ रुपये असेल.