एस. के. गुप्ता ।नवी दिल्ली : आंबेडकर वसतिगृहांसह सर्व सरकारी, खासगी वसतिगृहांतील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १५ किलो गहू वा तांदूळ बीपीएल दराने देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.ही योजना मुलींच्या वसतिगृहांतील सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणार आहे. यासाठी किती धान्य लागेल हे कळवण्यास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली. यंदाच ते सुरू करण्याची केंद्राची इच्छा आहे.मुलींसाठीही योजना जातीपातीचे बंधन न राखता वसतिगृहांतील सर्वच विद्यार्थिनींना बीपीएल दराने धान्य देण्यात येईल. या योजनेद्वारे १३ लाख ८४ हजार ८४३ टन धान्यवाटप केले जाईल.
दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना स्वस्त धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:10 AM