कर्ज मिळवून देण्याच्या नावाने फसवणूक
By admin | Published: February 22, 2016 7:29 PM
जळगाव- कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ठिकठिकाणच्या बचत गटातील महिलांची फसवणूक केल्याने फसवणूक करणार्या संबंधिताच्या आंबेडकर मार्केटमधील कार्यालयात महिला सोमवारी दुपारी एकत्र आल्या.
जळगाव- कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ठिकठिकाणच्या बचत गटातील महिलांची फसवणूक केल्याने फसवणूक करणार्या संबंधिताच्या आंबेडकर मार्केटमधील कार्यालयात महिला सोमवारी दुपारी एकत्र आल्या. म्हसावद, मेहरूण, अडावद, धानोरा येथील सुमारे १५ महिला आंबेडकर मार्केटमध्ये एकत्र आल्या. त्यांनी आपली कशी फसवूक झाली याची कैफीयत मांडली. बहिणाबाई बहुउद्देशीय महिला बचत गट संस्थेच्या नावाने सलीम पिंजारी व इतरांनी आंबेडकर मार्केटमध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यालय उघडले. त्यांनी मेहरूण, म्हसावद, अडावद, धानोरा व इतर ठिकाणच्या महिलांना एकत्र करून कर्ज प्रकरणे मंजूर करून देऊ, अशी बतावणी केली. कर्ज मिळावे यासाठी प्रथम एक हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन जयदुर्गा, मदिना, रझा, अनप आदी बचत गटातील महिलांनी पैसे गोळा केले व त्याला दिले. तीन महिने झाले तरी कर्ज मिळाले नाहीपैसे गोळा करून तीन महिने झाले आहेत. सुरुवातीला आंबेडकर मार्केटमधील कार्यालय उघडे असायचे. पण मागील काही दिवसांपासून हे कार्यालय बंद आहे. तर पिंजारी व त्याच्या इतर साथीदारांचे मोबाईलही बंद आहेत. मागील शनिवारी कर्ज काढून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आता पर्यायच नाहीत, अशी तक्रार आशा लांडे, उर्मिला सोनार, तायरा खान आदींनी केली. कर्ज प्रकरणांसाठी पैशांची मागणीकर्ज मिळावे यासाठी प्रकरणे तयार करावी लागतील. त्यासाठी पैशांची गरज आहे, अशी बतावणीही या संस्थेच्या कर्मचार्यांनी केली होती, अशी तक्रारही महिलांनी केली.