नाशिक : कोपरगावच्या काकडी विमानतळाजवळ प्लॉट देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी जळगावला प्रॉपर्टी मेळा भरविला. यात शासनाने विमानतळासाठी हस्तांतरित केलेली जमीन दाखवून आठ तक्रारदारांची २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.जिल्ह्णातील यशवंत कॉलनीमधील सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी सुरेश खंडेराव पाटील यांनी नाशकातील कामटवाडे व सिडको परिसरातील संशयित सुनील मारुती ढोली, जितेंद्र अशोक जगताप, योगेश सुभाष विश्वंभर, किरीट दगडू सद्गीर व दगडू पाटील या पाच व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिली आहे.संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. यात प्लॉटसाठी नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर नाशकात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले. कोपरगावला भविष्यात विमानतळ होणार असून जागेला मोठा भाव मिळणार असल्याचे सांगून शासनाची जमीन दाखवून या जागेवर भूखंड पाडले जातील, असे सांगून प्रत्येकाकडून नोंदणीच्या नावाखाली ५०० ते १००० रुपये गोळा केले. सध्या आठ तक्रारदार पोलिसांपर्यंत पोहचले असून, त्यांनी २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.वेळोवेळी उकळले पैसेया पाच भामट्यांनी बनावट कंपनीच्या नावाने खासगी बॅँकेत खाते उघडले. प्लॉटधारक म्हणून नोंदणी केलेल्या नागरिकांकडून वेळोवेळी एक ते पाच लाखांपर्यंत पैसे उकळले आणि जमा झालेली रक्कम बॅँक खात्यात भरली. प्लॉट एनए झाल्यानंतर विक्री करणार असल्याचे सांगून ७९९ प्लॉटधारकांची नोंदणी क रून घेतली आहे.
सरकारी जमीन दाखवून फसवणूक, तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 4:53 AM