नवी दिल्ली : पेन्शन निश्चितीस विलंब होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची निवृत्तीच्या पाच वर्षे आधीच तपासणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना दिले आहेत.कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. सेवा रेकॉर्ड तपासणीतील दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया लांबते आणि त्यास विलंब होतो. हे टाळण्यासाठी निवृत्तीच्या पाच वर्षांआधीच प्रत्येक कर्मचाऱ्याचे सेवा रेकॉर्ड तपासा, असे या आदेशात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)विद्यमान नियमानुसार, कर्मचाऱ्याच्या सेवेची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि दुसऱ्यांना त्याच्या निवृत्तीच्या तारखेच्या पाच वर्षांआधी सेवा रेकॉर्ड तपासून सेवा योग्यतेबाबतचे प्रमाणपत्र जारी करणे बंधनकारक आहे. या नियमाअंतर्गत दिलेले प्रमाणपत्र अंतिम मानले जाईल आणि अपवादात्मक स्थिती वगळता ते दुसऱ्यांदा उघडले जाणार नाही, असेही हा नियम सांगतो. मात्र या नियमांचे पालन होत नसल्याने कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया विनाकारण लांबत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच या नियमांचे कठोर पालन यापुढे बंधनकारक असेल, असे या आदेशात म्हटले आहे. या नियमांचे उल्लंघन गंभीर मानले जाईल, अशी ताकीदही कार्मिक विभगाने दिली आहे.
निवृत्तीच्या ५ वर्षे आधी रेकॉर्ड तपासा
By admin | Published: September 21, 2015 11:32 PM