चेन्नई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेकजण आपलं योगदान देत आहे. क्रिकेटर्संपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वजचण आर्थिक मदत देत आहेत. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. आता, साऊथचा सुपरस्टार आणि थलैवा रजनीकांतनेही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आपलं आर्थिक योगदान दिलं आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांची भेट त्यांच्याकडेच मदतनिधी चेक स्वरुपात दिला आहे.
कोरोनाविरुद्धची लढाई आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचं पालन करायलाच हवं. तरच, आपण कोरोनाला थांबवू शकू, असे रजनीकांतने म्हटले. रजनीकांतने 50 लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. रजनीकांतसह अनेक सेलिब्रिटींनी आणि क्रिकेटर्संनेही कोरोना काळात मदत निधी दिला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही 5 कोटी रुपयां निधी उभारण्याचं लक्ष्य ठेवलं होत, जे काही दिवसांतच त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर, आणखी मोठा निधी त्यांच्याकडून उभारण्यात आला आहे.
रजनीकांतने घेतला लसीचा दुसरा डोस
कोरोनाच्या दुसर्या लाटेविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. अनेकजण व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करतायेत. तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनीही काही दिवसांपूर्वीच व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांची मुलगी सौंदर्या हिने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली होती.