नवी दिल्ली - इंडियन आयडॉलचा परिक्षक, प्रसिद्ध गायक आणि आम आदमी पक्षाचा समर्थक विशाल ददलानीची गोची झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठं यश मिळवलं. त्यामुळे, दिल्लीत तिसऱ्यांचा आम आदमी पक्षाचं सरकार आणि अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील विजयाचा आम आदमीला अत्यानंद झालाय.
आपचे कट्टर समर्थक बनून आप आदमी पक्षाच्या प्रचारातील संगीत आणि गाण्यांची धुरा सांभाळणाऱ्या विशाल ददलानीने आपच्या विजयाचा आनंद झाल्याचं म्हटलं आहे. यंदाच्या निवडणुकीत आपला 70 पैकी 70 जागांवर विजय मिळेल, असा विश्वास ददलानी यांना होता. त्यामुळे, 70 या आकडेवारीवरुन त्यांनी विजयीगीतही कंपोज केले होते. मात्र, आपलाला 62 जागांवर विजय मिळाल्याने गाणे कंपोस करण्यासाठी विशालची गोची झाली आहे. विशेष म्हणजे 56 जागा आल्या असत्या तर, त्यासाठीही 56 तारे तोड नाच लूँ... या शब्दांनी हे गाणे कंपोज करण्यात येणार होते. मात्र, 62 जागांवर विजय मिळाल्याने आता नेमकं कसं गाणं बनवायचं हा मोठा प्रश्न विशालपुढे उभारला आहे. कारण, 62 हा आकडा मोस्ट नॉन म्युझिकल नंबर असल्याचं विशाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन म्हटले आहे.
विशाल ददलानी यांना एका ट्विटर युजर्सने विजयी गीताबद्दल विचारणा केली होती. तसेच, 70 के 70 या गाण्याचं काय? तुम्ही हे गाणं रिलीजसाठी तयार आहे.. असे म्हटले होते, अशी विचारणा केली. त्यावर, उत्तर देताना विशालने 62 या विजयी आकड्यामुळे गोची झाल्याचं म्हटलं आहे. आपच्या विजयाचा मला खूप आनंद आहे. पण, शेवटचा फिगर (आकडा) हा गाणं कंपोज करण्यासाठी खूपच आव्हानात्मक असल्याचे विशालने म्हटले.