कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:46 PM2023-05-09T17:46:15+5:302023-05-09T17:55:53+5:30
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.
Kuno National Park: भारताला पुन्हा चित्त्यांचा देश म्हणून ओळख मिळून देण्यासाठी गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून विशेष अभियान राबवण्यात आले. या चित्ता प्रकल्पांतर्गत दक्षिण आफ्रिकेहून भारतात चित्ते आणले जाणार आहेत. दरम्यान, यापूर्वी भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्ताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये हे सर्व चित्ते सोडण्यात आले आहे. यातील मादी चित्ता 'दक्षा' हिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यावेळेस तिच्या मृत्यूचे कारण आजारपण नसून लढाई आहे. तिचे इतर चित्यासोबत कडाक्याची झुंज झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मादी चित्ता दक्षा आणि धीराची नर चित्ता फिंडा, वायु आणि अग्नि यांच्याशी लढाई झाली. यामध्ये दक्षाचा मृत्यू झाला.
यापूर्वी उदयचा मृत्यू झाला
यापूर्वी 23 एप्रिल रोजी कुनो नॅशनल पार्कमध्येच उदय नावाच्या चित्ताचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 27 मार्चरोजी किडनी विकाराने मादी चित्त्याचा मृत्यू झआला होता. दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये 20 चित्ते आणण्यात आले होते, त्यापैकी 17 आता शिल्लक आहेत. सध्या चार चित्त्यांना खुल्या जंगलात सोडण्यात आले आहे.