Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:16 AM2024-11-28T10:16:52+5:302024-11-28T10:18:25+5:30

News about Kuno National Park: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये असलेल्या चित्त्याच्या दोन पिलांचे मृतदेह आढळून आले आहे. दोन्ही मृतदेहावर जखमा आढळून आल्या आहेत.

Cheetah Kuno: Two cheetah cubs have died in Kuno National Park, the carcasses covered with wounds | Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 

Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 

Two Cheetah Cubs Died in Kuno National Park: मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधून एक वाईट बातमी समोर आली. आफ्रिकेतून आणलेल्या एका चित्ता मादीने दोन पिलाना जन्म दिला होता. त्यांचे मृतदेह बुधवारी (२७ नोव्हेंबर) आढळन आले. दोन्ही पिल्लांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या निर्वा चिता मादीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. सिंह परियोजना शिवपुरीचे संचालकांकडून या घटनेची माहिती देण्यात आली. 

२७ नोव्हेंबर रोजी सकाळी साधारणतः ११ वाजता रेडिओ टेलिमेट्री आधारे माहिती मिळाली की निर्वा चिता मादी तिच्या नेहमीच्या क्षेत्रापासून दूर आहे. त्यानंतर वन्यप्राणी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षेत्राची पाहणी करण्यात आली. चिता मादीचा वावर असलेल्या क्षेत्रात पाहणी केली. 

तिथे चित्त्याची दोन पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. दोन्ही पिल्लांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले. परिसरातील इतर ठिकाणी पाहणी केली असता चित्त्याची पिल्ले असल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. निर्वा मादीने या दोन पिल्लांना जन्म दिला होता. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वा नावाची चित्ता मादीची प्रकृती चांगली आहे. चित्त्याच्या पिल्लांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पिल्लांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल. इतर चित्ते आणि १२ पिल्लं व्यवस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Cheetah Kuno: Two cheetah cubs have died in Kuno National Park, the carcasses covered with wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.