चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईत एका ११ वर्षांच्या कर्णबधीर मुलीवर तब्बल ७ महिने बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली असून, आणखी चार जणांचा शोध सुरू आहे. इमारतीचा लिफ्टमन, सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा करणार कर्मचारी यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.शाळेतून बसमधून घरी पतरल्यावर या मुलीवर प्रथम लिफ्टमनने बलात्कार केला. ते करण्यापूर्वी तिला गुंगीचे औषध पाजण्यात आले. बलात्काराचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले. त्यानंतर त्या व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून इमारतीतील अन्य कर्मचारीही तिच्यावर बलात्कार करू लागले. कधी टॉयलेटमध्ये तर कधी कोणत्या तरी रिकाम्या जागेत हे प्रकार सुरू होते. ती शाळेतून परतताच तिला कधी जबरदस्तीने गुंगीचे औषध दिले जात असे, तर शीतपेयांमध्ये अंमली पदार्थ प्यायला घालत. याची वाच्यता केल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही तिला दिली जात असे.हा प्रकार तब्बल सात महिने सुरू होता. अखेर आपल्या मोठ्या बहिणीच्या कानावर तिथे ही बाब घातली. मोठ्या बहिणीने पालकांना हा प्रकार सांगताच पालकांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेतली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि इमारतीत काम करणाऱ्या एकूण १८ कर्मचाºयांना अटक केली. आरोपींना महिला न्यायालयात नेले असता वकिलांनी त्यांना बुकलून काढले. वकिलांनी त्यांची बाजू न मांडण्याचा निर्णय घेतला.
>उत्तराखंडातही पाच मुलांकडून हीन कृत्यउत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये पाच अल्पवयीन मुलांनी अश्लील चित्रफीत (पोर्नो फिल्म) पाहून आठ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. ही पाचही मुले १४ वर्षांच्या आतील असून, एक जण तर ९ वर्षांचा आहे. त्या सर्वांना बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. ही मुलगी घराबाहेर खेळत असताना, पाचपैकी एक मुलगा तिच्यापाशी गेला. आपण एकत्र खेळू, असे सांगून त्याने तिला अन्य मित्राच्या घरी नेले. तिथे पाचही जणांनी तिच्यावर बलात्कार केला.