राग हे विनाशाचे लक्षण आहे असे म्हणतात. जेव्हा राग येतो तेव्हा माणूस नेहमीच नुकसान करतो. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूच्या चेन्नईतील कांचीपुरममधून समोर आली आहे. रागाच्या भरात एका डॉक्टरने तब्बल 50 लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कांचीपुरममध्ये एका डॉक्टरचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झालं. त्यानंतर डॉक्टरने त्याची मर्सिडीज बेंझ कार पेटवून दिली. मोकळ्या मैदानात रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, धर्मपुरी येथील रहिवासी असलेल्या कविनने गेल्या वर्षी कांचीपुरम येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले असून तो एका खासगी रुग्णालयात काम करतो.
50 लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून फिरायला गेले अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काव्या आणि कविन यांची कॉलेजपासूनची मैत्री होती. तेव्हापासून काव्या त्याची गर्लफ्रेंड होती. सध्या ती एका खासगी क्लीनिकमध्ये काम करते. गुरुवारी रात्री कविनने काव्याला तिच्या 50 लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून फिरायला आणलं. त्यानंतर दोघेही कांजीपुरम जिल्ह्यातील राजाकुलम तलावाजवळील निर्जन भागात गेले.ट
कार पूर्णपणे जळून खाक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे तिथे भांडण झाले. त्यानंतर कविनने रागाच्या भरात कारवर पेट्रोल टाकून आग लावली. गाडीला आग लागल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. कांचीपुरम पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. सध्या पोलिसांनी कविनची जामिनावर सुटका केली आहे. कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"