शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

धक्कादायक ! Swiggy अ‍ॅपवरुन ऑर्डर केलं 'चिकन नुडल्स', खाताना आढळलं वापरलेलं 'बँडेज' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 4:04 PM

बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच ही बातमी शेअर करताना बालामुरग यांनी ओमिटच्या इमोजीचा वापर केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते.

चेन्नई - तामिळनाडूतील चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्विगीमधून ऑर्डर केलेल्या अन्नामध्ये चक्क वापरेलं बँडेज आढळून आलं आहे. विशेष म्हणजे या बँडेजवर रक्ताचे दागही दिसत आहेत. शहरातील बालामुरगन यांनी रविवारी स्विगी अ‍ॅपच्या माध्यमातून एका हॉटेलमधून जेवण मागविले होते. फूड सर्व्हीस कंपनी स्विगीने ही ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवली. मात्र, निम्मं जेवण झाल्यानंतर या जेवणात बँडेड आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच ही बातमी शेअर करताना बालामुरग यांनी ओमिटच्या इमोजीचा वापर केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते. मात्र, या नुडल्समध्ये वापरलेल बँडेज आढळून आल्याच या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. याबाबत संबंधित रेस्टॉरंटला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कुठलंही प्रतिउत्तर मिळाल नाही. याउलट आपण स्विगी अ‍ॅपद्वारेच दुसऱ्यांदा जेवणाची ऑर्डर करण्याचा पर्याय सूचविण्यात आला. मात्र, स्विगीशीही थेट फोनद्वारे संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे केवळ अ‍ॅपद्वारे चॅटिंग करुनच ही तक्रार सांगण्याचा पर्याय माझ्याकडे असल्याचं बालामुरगन याने म्हटले आहे. दरम्यान, स्विगी आणि संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांच्या जेवणाची किती काळजी घेतली जाते, हा खरा प्रश्न आहे. तसेच, जेवण बनवणारे आचारी हँडग्लोज वापरतात का, स्विगीचे कर्मचारीही तशी काळजी घेतात का, असा प्रश्नही या फेसबुक पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. 

स्विगी अ‍ॅप वापरकर्त्यांनी याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. तर संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाबाबत सतर्क असावे. तसेच स्विगीनेही आपल्या अॅपच्या माध्यमातून अन्नसेवा पुरविणाऱ्या रेस्टॉरंटची निवड करताना, योग्य ती काळजी आणि खात्री करणे, आवश्यक असल्याचं बालामुरगन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप स्विगीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसून केवळ investigate and get back to me in a day or two असा मेसेज कंपनीकडून आल्याचेही मुरगन म्हणाले.

टॅग्स :hotelहॉटेलfoodअन्नonlineऑनलाइनFacebookफेसबुक