चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नईमध्ये पाण्याचे संकट गडद झाले असून, पाण्यावरून हाणामाऱ्या होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दरम्यान, पाणीटंचाईमुळे अनेक कंपन्यांनी आपले युनिट बंद केले असून, आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगत आहेत.चेन्नई मेट्रो वॉटर सप्लायचे व्यवस्थापकीय संचालक टी.एन.हरिहरन यांनी सांगितले की, चेन्नईला दररोज ८३० मिलियन लिटर (एमएलडी) पाणी लागते. आता ते घटून ५२५ एमएलडी झाले आहे. शोलावरम आणि चेमाबरमबक्कम यासारखे तलाव आटले आहेत. पाण्यामुळे झालेल्या संघर्षात मागील आठवड्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
चेन्नईमध्ये पाणी पेटले, द्रमुकने सरकारला केले लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:43 AM