इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद यांची त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, प्रत्येक भारतीयाप्रमाणेच आम्हालाही प्रज्ञानंद यांच्या कामगिरीबद्दल खूप अभिमान आहे. प्रज्ञानंद आता जागतिक क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर आहे आणि लवकरच तो जगातील नंबर १ बनेल.
हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात
एस सोमनाथ म्हणाले की, बुद्धिबळ हा जुना खेळ भारतात सुरू झाला आणि त्याचे मूळ इथेच आहे. हा मेंदू आणि प्रतिभांचा खेळ आहे, तो नियोजन आणि रणनीतीचा खेळ आहे आणि त्यामुळेच भारत त्यात पुढे आहे. आम्हाला अभिमान आहे की चंद्रासोबत जमिनीवरही प्रज्ञान आहे.
एस सोमनाथ म्हणाले की, प्रज्ञानंद इस्त्रोसोबत काम करणार आहेत. आम्ही भारतासाठी जे चंद्रावर केले ते त्याने जमिनीवर आणि आता तो अंतरळासाठी आमच्यासोबत काम करणार आहे.
'प्रज्ञानंद तरुणांना विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आणि भारताला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आमच्यासोबत काम करतील, असंही एस सोमनाथ म्हणाले.