सीने में जलन, आँखो में तुफान..! दिल्लीतील प्रदूषणामुळे राहुल गांधींचे ट्विट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:06 AM2017-11-14T01:06:13+5:302017-11-14T01:06:35+5:30
‘सीने में जलन, आँखो में तुफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है?’ दिल्लीतील प्रदूषणामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ही गझल आठवली आहे.
नवी दिल्ली : ‘सीने में जलन, आँखो में तुफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है?’ दिल्लीतील प्रदूषणामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ही गझल आठवली आहे. प्रख्यात शायर शहरयार यांची ही रचना. उत्तर भारतातील प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यात जबाबदार लोक निष्क्रियता दाखवित असल्याचे टिष्ट्वट राहुल यांनी केले आहे.
प्रदूषणामुळे दिल्लीकर त्रस्त आहेत. श्वास घेण्यास त्रास, जळजळ व डोळ्यांची आग असे त्रास होत आहेत. त्याचा उल्लेख करीत राहुल यांनी ‘क्या बतायेंगे साहब, सब जानकर अंजान क्यो है?’ या ओळीही लिहिल्या आहेत. दिल्ली व परिसरात धूळ व धूरमिश्रित धुके आहे. लोकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले असून, हरित लवादाने यावर तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्ली सरकारला दिले आहेत.