उत्तर प्रदेश शिवसेनेने माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. कोणत्या परिस्थितीमध्ये चेतन चौहान यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) रूग्णालयातून गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. एसजीपीजीआय सारख्या नामांकित संस्थेवर सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल शिवसेनेने निवेदनाद्वारे केला आहे.
एसजीपीजीआय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांच्या वर्तणुकीवर चेतन चौहान यांनी नाराजी दर्शविली होती. अद्यापही रुग्णालयाच्या दोषी डॉक्टर व कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. करोनामुळे राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही सरकार झोपा काढत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी, उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचेही कोरोनाने निधन झाले होते.
दरम्यान, चेतन चौहान यांचा डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला, या आरोपाचे त्यांची पत्नी संगीता चौहान यांनी खंडन केले आहे. यावेळी लोकांनी माझ्या पतीच्या निधनाबद्दल वाद निर्माण करू नये. ते एक महान व्यक्ती होते. लोक त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याविषयी समस्या आम्हाला कधीच सांगितली नाही. कुटुंबीच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना एसजीपीजीआयमधून मेदांता रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्य सरकारने आम्हाला मदत केली, असे संगीता चौहान यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या...
- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...
- "राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"
- महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा
- बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब
- गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!
- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल
- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!