बिलासपूरः छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये हैदराबाद बलात्कारसारखी निर्दयी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बिलासपूरच्या पेंड्रातल्या गौरेला ठाण्याच्या क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या मुलीसोबत निर्भया प्रकरणासारखं कृष्णकृत्य केलं आहे. त्यानंतर तिला तिकडे सोडून ते पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे.1 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपींना 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केलं आहे. या प्रकरणी आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेव्हा पीडिता घराच्या जवळच असलेल्या शेतात गायीला चरण्यासाठी घेऊन गेली असता त्यांनी संधीचा फायदा घेत तिच्यासोबत हे क्रूरकृत्य केलं आहे. 28 वर्षीय राय सिंह आणि 20 वर्षीय मनोज वाकरे यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असून, आत्येला पाहून आरोपींनी पलायन केलं.
हैदराबादनंतर छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 9:19 PM