शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

वाघनखांपाठोपाठ छत्रपती शिवरायांची तलवारही येणार? ऋषी सुनक यांच्यावर दबाव, केंद्रासह महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 7:18 AM

अशोक टंडन यांच्या आगामी पुस्तकात तपशील... 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्याच्या मोहिमेला मागील काही दिवसांपासून वेग आला आहे. सुरुवातीला भास्कर घोरपडे यांनी सुरू केलेल्या या मोहिमेत आता महाराष्ट्र सरकारही सहभागी झाले आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ मंत्री लंडनमध्ये जाऊन आले. त्यामुळे या तलवारीसाठी ऋषी सुनक यांच्यावर दबाव वाढल्याचे म्हटले जात आहे.ही तलवार भारतात आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा सविस्तर तपशील दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे माजी माध्यम सल्लागार अशोक टंडन यांनी दिला आहे. त्यांच्या ‘द रिव्हर्स स्विंग’ या पुस्तकाचे १८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय पेट्रोलियम व गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री हरिदीप सिंह पुरी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीकसर्वप्रथम राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे ३५० वर्षे जुनी तलवार परत मिळावी, यासाठी   याचिका पाठवण्यात आली होती. ही तलवार म्हणजे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि देशातील लोकांसाठी, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांसाठी त्याला मोठे भावनिक मूल्य आहे, असे त्यात म्हटले होते.

त्यावर ब्रिटिश सरकारने सांगितले होते की, ही तलवार १८५७ मध्ये कोल्हापूरच्या तत्कालीन महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स, एडवर्डस सातवे यांना भारत दौऱ्यात भेट दिली होती. ती अत्यंत सुरक्षितपणे जतन करण्यात येत असून, भारतातून येणाऱ्या लाखो लोकांना ती पाहण्यास उपलब्ध आहे.

२०२४ पूर्वी तलवार आणावी- तलवार परत आणण्याच्या मोहिमेत महाराष्ट्र सरकार सहभागी झाले असून, मोदी सरकारने हा विषय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे उपस्थित करावा. - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २०२४ पर्यंत ही तलवार परत आणावी, अशी विनंती केली आहे. - सध्या ही तलवार लंडनमध्ये सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टचा भाग आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRishi Sunakऋषी सुनकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार