रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. छत्तीसगडच्या 90 जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 46 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी स्वीकारली आहे. छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.